‘ग्रीन पॉवर’चा ऊस गाळपाचा राज्यात विक्रम : देशमुख

By Admin | Updated: March 23, 2015 00:34 IST2015-03-22T23:35:40+5:302015-03-23T00:34:29+5:30

कारखान्याने पहिल्याच हंगामात सुमारे ५ लाख टन ऊस गाळप यशस्वीपणे पार केले

'Green Power' in the state of cane crush: Vikram Deshmukh | ‘ग्रीन पॉवर’चा ऊस गाळपाचा राज्यात विक्रम : देशमुख

‘ग्रीन पॉवर’चा ऊस गाळपाचा राज्यात विक्रम : देशमुख

नेवरी : ग्रीन पॉवर शुगर साखर कारखान्याने पहिल्याच गळीत हंगामात उद्दिष्टापेक्षा ५० हजार टन जास्त ऊस गाळप करून राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. ३.५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट प्रत्यक्षात कार्यरत केलेल्या ग्रीन पॉवर शुगर साखर कारखान्याने पहिल्याच हंगामात सुमारे ५ लाख टन ऊस गाळप यशस्वीपणे पार केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली. खेराडे वांगी (ता. कडेगाव) येथील कारखान्याचे गटविकास कार्यालयाचे उद्घाटन संपतराव देशमुख दूध सेवाच्या उपपदार्थांच्या विक्री प्रारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देशमुख म्हणाले की, ग्रीन पॉवर शुगर कारखान्यामधून शेतकऱ्यांना ऊस वाढीसाठी लागेल ती यंत्रणा उपलब्ध आहे. त्याचा वापर करून उसाचे टनेज वाढवावे.
यावेळी दत्तुशेठ सूर्यवंशी, युवराज सावंत, लक्ष्मण कणसे, उदयसिंह घाडगे, ग्रीन पॉवरचे सरव्यवस्थापक डी. जी. पाटील, शंकर मोहिते (नाना), रामचंद्र घार्गे, आबासाहेब साळुंखे, सरपंच सत्यवान मोहिते, वसंतराव महाडिक, गिरीश कुलकर्णी, चंद्रकांत मोरे, मनोहर सकट, जी. डी. महाडिक, दादासाहेब कदम, आप्पासाहेब जंगम, संजय सूर्यवंशी, डी. जी. पाटील आदींसह कारखान्याचे कर्मचारी, ग्रामस्थ, सभासद उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 'Green Power' in the state of cane crush: Vikram Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.