प्रसार माध्यमाद्वारे रोजगाराच्या मोठ्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:15+5:302021-02-05T07:27:15+5:30
कवठेमहांकाळ येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र यांच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा ...

प्रसार माध्यमाद्वारे रोजगाराच्या मोठ्या संधी
कवठेमहांकाळ येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र यांच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने ‘मराठी भाषेचा प्रसार माध्यमात वापर व रोजगाराच्या संधी’ या विषयावर प्रा. शशिकांत पोरे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एम. के. पाटील होते.
शशिकांत पोरे यांनी जनसंपर्काच्या मुद्रित, श्राव्य आणि दृकश्राव्य या तीनही माध्यमांमध्ये मराठी भाषेचे शास्त्र व तंत्रशुद्ध ज्ञान असणाऱ्या व्यक्तीला खूप मागणी असल्याचे सांगून मुद्रित शोधन, जाहिरात, संपादन आदी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी सांगितल्या.
यावेळी बाळासाहेब शिंदे, सुदर्शन शिंदे, विशाल शिंदे, डॉ. मोहन लोंढे, प्रा. विजय कोष्टी, प्रा. सतीश पाटील, डॉ. दिलीप गाडे आदी उपस्थित होते. प्रा. सीमा सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पल्लवी पाटील हिने सूत्रसंचालन केले.
फोटो-२८कवठेमहांकाळ१
फोटो ओळ : कवठेमहांकाळ येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रा. शशिकांत पोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. एम. के. पाटील, प्रा. मोहन लोंढे, प्रा. दिलीप गाडे, प्रा. सीमा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.