इस्लामपुरात स्वच्छतेसाठी पालिकेला दिले गवत कापणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:50+5:302021-09-19T04:27:50+5:30

इस्लामपूर : महादेवनगर परिसरातील मोकळ्या प्लॉटमध्ये पावसामुळे वाढलेले गवत आणि झुडुपांमुळे डासांचे प्रमाण वाढून रोगराई वाढत आहे. यावर स्वच्छता ...

Grass harvesting machine given to the municipality for cleaning in Islampur | इस्लामपुरात स्वच्छतेसाठी पालिकेला दिले गवत कापणी यंत्र

इस्लामपुरात स्वच्छतेसाठी पालिकेला दिले गवत कापणी यंत्र

इस्लामपूर : महादेवनगर परिसरातील मोकळ्या प्लॉटमध्ये पावसामुळे वाढलेले गवत आणि झुडुपांमुळे डासांचे प्रमाण वाढून रोगराई वाढत आहे. यावर स्वच्छता हाच एकमेव उपाय आहे. हे ओळखून सामाजिक कार्यकर्ते सुजित थोरात यांनी मित्रपरिवाराच्या मदतीने पालिकेला गवत कापणी यंत्र सुपूर्द केले.

मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी हे यंत्र स्वीकारले. महादेवनगर येथील कार्यकर्त्यांनी दिलेले गवत कापणी यंत्र त्याच परिसरासाठी वापरले जाईल. पालिकेचे आरोग्य कर्मचारी या परिसराची स्वच्छता ठेवतील. या उपक्रमाचे साबळे यांनी कौतुक केले.

महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजीत थोरात म्हणाले, सामाजिक बांधिलकी मानून हा उपक्रम हाती घेतला आहे. परिसरात गवत आणि झुडपे वाढून डासांच्या उत्पत्तीत मोठी वाढ झाली आहे. मानवी आरोग्यास ही बाब धोकादायक असल्याने हे इंधनावर चालणारे मानव संचलित यंत्र दिले आहे. त्यामुळे स्वच्छता राहून नागरिकांचे आरोग्य उत्तम राहील, या जाणिवेतून हा उपक्रम राबविला आहे.

यावेळी मनसेचे सतीश पवार, धीरज कबुरे, मयुरेश शेजाळे, रवींद्र विरकर, विक्रांत सूर्यवंशी, ऋषिकेश पाटणकर, संकेत भंडारे, अखिलेश शिंदे उपस्थित होते.

फोटो : १८ इस्लामपूर १

ओळ : इस्लामपूर येथे महादेवनगर मित्र परिवारातर्फे सुजीत थोरात यांनी मुख्याधिकारी वैभव साबळे यांना गवत कापणी यंत्र सुपूर्द केले. यावेळी सतीश पवार, धीरज कबुरे, मयुरेश शेजाळे, रवींद्र विरकर उपस्थित होते.

Web Title: Grass harvesting machine given to the municipality for cleaning in Islampur