शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कॅलिफोर्नियातून द्राक्षे, इराणचे सफरचंद; सांगलीच्या बाजारात फळांची रेलचेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:54 IST

दरही आवाक्यात, हिवाळ्यात आरोग्यासाठी अवश्य खा

सांगली : हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरणात आरोग्याची भर टाकण्यासाठी बाजारात देशी-विदेशी फळांची रेलचेल झाली आहे. त्यांचे दरही आवाक्यात असून सांगलीकर फळांवर ताव मारताना दिसत आहेत.बाजारात संत्री, मोसंबी, पेरू, सीताफळ, द्राक्षे, सफरचंद, पपई, कलिंगड, अननस यांसारख्या देशी फळांची आवक वाढली आहे. मार्गशीर्ष या उपवासाच्या महिन्यामुळेही भाज्या व फळांची रेलचेल आहे. उपवास आणि पुजेसाठी फळांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. विष्णूअण्णा पाटील फळ बाजारात दररोज पहाटे कित्येक टन फळांचे घाऊक सौदे निघत आहेत. त्यानंतर ती किरकोळ विक्रीसाठी सांगली-मिरजेसह जिल्हाभरात जात आहेत.

फळांचे किरकोळ दर भारतीय सफरचंद १२० ते १४०, इराणी सफरचंद १८० ते २००, आयात सफरचंद २५० ते २६०, मोसंबी १००, नागपूर संत्री ६० ते ७०, सीताफळ ८० ते १००, पेरू ६० ते ८०, ॲपल बोरे ४० ते ७०, ड्रॅगन फ्रुट ७० ते ८०, डाळिंब १८० ते २०० (सर्व दर प्रतिकिलो), पपई एक नग ३० ते ५०, किवी ८० ते १०० रुपये बॉक्स, कलिंगड ८० ते १००, अननस ६० ते १००

टेबलफ्रुट द्राक्षे आणि आरोग्यदायी ॲवाकेडोकॅलिफोर्नियातून आलेली लाल-काळी द्राक्षेही भाव खात आहेत. ही गोल, गरगरीत द्राक्षे चवीला फार गोड नसली, तरी टेबलफ्रुट म्हणून डायनिंग टेबलवर जागा मिळवत आहेत. क जीवनसत्त्व असणारे व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाणारे ॲवाकेडोदेखील भाव खाऊन आहे. १०० रुपयांना नग यानुसार विक्री सुरू आहे.

फळे खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. सध्या विविध देशी-विदेशी फळांचा हंगाम जोरात असल्याने बाजारातही आवक वाढली आहे. दर स्थिर असल्याने ग्राहक फळे खाण्याचा आनंद घेत आहेत. - कुमार नरळे, फळ विक्रेता

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजारfruitsफळे