गोवा २०, कोल्हापुरात २६ मार्चपासून द्राक्ष महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST2021-03-14T04:24:37+5:302021-03-14T04:24:37+5:30
ते म्हणाले की, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकरी अडचणीत असेल तेंव्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिली आहे. ...

गोवा २०, कोल्हापुरात २६ मार्चपासून द्राक्ष महोत्सव
ते म्हणाले की, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकरी अडचणीत असेल तेंव्हा शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिली आहे. फळे व धान्य महोत्सव यापूर्वी यशस्वी केले आहेत. आंबा महोत्सव सांगलीत घेऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यावर्षी द्राक्षाचे दर पडल्यामुळे छोटे-मोठे शेतकरी चिंतेत आहेत. या शेतकऱ्यांची द्राक्ष शेतकरी ते ग्राहक थेट पोहोचविण्यासाठी द्राक्ष महोत्सवाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळानेही गोवा आणि कोल्हापुरातील द्राक्ष महोत्सवाला मंजुरी दिली आहे. महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला शासनाकडून दोन हजार रुपयांचे अनुदान आहे. यामध्ये उर्वरित खर्च बाजार समिती उचलणार आहे. गोव्यातील महोत्सवासाठी तेथील सरकारने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. फौंडा येथे गाेव्यातील महोत्सव होणार आहे. महोत्सवातील सहभागी शेतकऱ्यांना जेवण, नाष्टा आणि राहण्याची व्यवस्था केली आहे. द्राक्ष बागायतदारांनी मोठ्या संख्येने द्राक्ष घेऊन महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही दिनकर पाटील यांनी केले आहे.