दीड लाख मेट्रीक टन खताचा कोटा मंजूर
By Admin | Updated: May 11, 2016 00:53 IST2016-05-10T22:47:02+5:302016-05-11T00:53:14+5:30
खरिपासाठी जिल्ह्याचा कोटा जाहीर; युरियाची मात्रा सर्वांत जास्त; गतवर्षीपेक्षा १४ मेट्रीक टनांची घट

दीड लाख मेट्रीक टन खताचा कोटा मंजूर
प्रकाश पाटील -- कोपार्डे --खरीप हंगाम तोंडावर आला असताना जिल्हा परिषद कृषी विभागाकडून त्याबाबत काटेकोर धोरण अवलंबले आहे. या खरीप हंगामासाठी जिल्ह्यासाठी रासायनिक खतांचा एक लाख ४० हजार मे. टनाचा कोटा मंजूर झाला आहे. यात युरियाची मात्रा सर्वांत जास्त आहे.कोल्हापूर जिल्ह्यात सिंचनाची मोठी सोय असल्याने रब्बी व खरीप दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते. मात्र, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र लागवडीखाली येते. ऊस या नगदी पिकाकडे जिल्ह्यातील क्षेत्राचा मोठा कल असतो. यामुळे रासायनिक खतासाठीही मोठी मागणी असते. सर्वसाधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृगाचा डोस ऊस उत्पादक ऊस पिकाला प्राथमिकता देऊन देतात. यावेळी शेतकऱ्यांकडून रासायनिक खताला मोठी मागणी असते. यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून राज्य शासनाकडे विविध खतांची मागणी केली जाते.यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यासाठी रासायनिक खताचा एक लाख ४० हजार ८०० मे. टनाचा कोटा मंजूर झाला आहे. यात ५८ हजार ९०० मे. टन युरिया खताचा सर्वांत जास्त कोटा आहे. तर संयुक्त खतांचा ३१ हजार ४०० मे. टनाचा कोटा आहे. मागील हंगामात एक लाख ५४ हजार मे. टन खतांचा कोटा कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर झाला होता. मात्र, यात यावर्षी १४ मे. टनांची घट झाली असून, युरियाच्या मात्रेत पाच हजार मे. टनांची घट झाली आहे. शेतकरी सेंद्रिय खताकडे वळाल्याने तसेच दुष्काळ परिस्थितीमुळे यात घट मानली जाते.
यावर्षी खताचा कोटा मंजूर झाला असला तरी खतांची टंचाई भासणर नाही. मागील काही वर्षांपासून रासायनिक खतापेक्षा आंतरद्रव्य खतांबरोबरच सेंद्रिय खतांकडे शेतकरी जास्त वळला आहे. यावर्षी उसाच्या क्षेत्रातही ४ हजार हेक्टरनी घट असल्याने खतांची टंचाई भासणार नाही.
- चंद्रकांत सूर्यवंशी
जि.प. कृषी अधिकारी
खरीप हंगाम २०१६ साठी मंजूर झालेली रासायनिक खतांची मात्रा पुढीलप्रमाणे. (मे. टनात)
युरिया५८,९००
एम. ओ. पी१६,२००
एस. एस. पी.२१,१००
डी. ए. पी.१३,२००
संयुक्त खते ३१,४००
एकूण १,४०,८००