शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी राष्ट्रवादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST2021-01-03T04:28:49+5:302021-01-03T04:28:49+5:30
सांगली : स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवसेनेचे सांगलीतील आजी-माजी पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ...

शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी राष्ट्रवादीत
सांगली : स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवसेनेचे सांगलीतील आजी-माजी पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत येत्या ४ जानेवारीस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात प्रवेश कार्यक्रम होणार आहे.
शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख अजिंक्य पाटील, अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र कोळी यांच्यासह सहा ते सात आजी-माजी पदाधिकारी राष्ट्रवादीत जाणार आहेत. गेल्या सहा दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती. शनिवारी जयंत पाटील यांनी दूरध्वनीवरुन शिवसेनेतील या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रवेशास हिरवा कंदील दर्शविला. वसंत कॉलनीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात ४ जानेवारीस सकाळी ११ वाजता कार्यक्रम होणार आहे. अजिंक्य पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमची पक्षाबाबत व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतीही नाराजी नाही. वरिष्ठ नेत्यांबाबतही तक्रार नाही. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जी वागणूक आम्हाला मिळाली, त्याबद्दल आमची नाराजी आहे. त्यामुळे आम्ही या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पक्ष सोडत आहोत. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगले काम करू. आमच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही राष्ट्रवादीत जाणार आहेत.
चौकट
शिवसेनेला फटका
अजिंक्य पाटील यांचा गट मोठा असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे. पक्षांतर्गत नाराजी दिसून येत असतानाही स्थानिक नेत्यांनी या आजी, माजी पदाधिकाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला नसल्याचे दिसून येते.