सभासदत्व हिरावून घेण्यास आजी-माजी अध्यक्ष कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:03+5:302021-04-06T04:25:03+5:30

शिरटे : आजी-माजी अध्यक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण दोघेही सभासदांचे सभासदत्व हिरावून घेण्यास कारणीभूत आहेत, असे ...

Grandparents cause ex-president to lose membership | सभासदत्व हिरावून घेण्यास आजी-माजी अध्यक्ष कारणीभूत

सभासदत्व हिरावून घेण्यास आजी-माजी अध्यक्ष कारणीभूत

शिरटे : आजी-माजी अध्यक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण दोघेही सभासदांचे सभासदत्व हिरावून घेण्यास कारणीभूत आहेत, असे मत कृष्णाचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी व्यक्त केले.

रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासद संपर्क दौऱ्यानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. दिलीपराव मोरे-पाटील, आनंदराव मलगुंडे, सुरेंद्र पाटील, डॉ. सुधीर जगताप, डॉ. संजय पाटील, प्रा. अनिल पाटील, गुलाबराब पाटील, संजय पाटील, एच. आर. पाटील, प्रतापराव पाटील यांची प्रमुख उपस्थित होते.

डॉ. मोहिते म्हणाले, गेल्या अकरा वर्षांत कृष्णा कारखान्याने यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेचा वसुली थांबवून संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. खुले सभासदत्व देऊन महाराष्ट्रातील सहकाराला दिशा देणारा कारखाना म्हणून ओळख असलेल्या या सहकाराचे मंदिर वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊया.

अ‍ॅड. विवेकानंद मोरे यांनी स्वागत केले. जे. व्ही. मोरे यांनी सूत्रसंचालन केले. डी. के. मोरे यांनी आभार मानले. यावेळी संदीप जाधव, जयसिंग मोरे, जगन्नाथ मोरे, प्रतापराव कदम, नामदेव कोळेकर, रमेश मोरे, डी. एस. मोरे, गणेश शिंदे, शंकरराव शिंदे, वसंतराव देसाई, रणजित मोरे उपस्थित होते.

Web Title: Grandparents cause ex-president to lose membership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.