ग्रामसेवकांनी विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:29+5:302021-09-14T04:31:29+5:30
मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथे देवराष्ट्रेचे ग्रामविकास अधिकारी सुरेश मोहिते व शिरगावचे ग्रामसेवक महादेव मोहिते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त आमदार मोहनराव ...

ग्रामसेवकांनी विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात
मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथे देवराष्ट्रेचे ग्रामविकास अधिकारी सुरेश मोहिते व शिरगावचे ग्रामसेवक महादेव मोहिते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, प्रा. श्रीकृष्ण मोहिते, सरपंच विजय मोहिते, प्रकाश मोरे, एच. एस यादव, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कोळी, पी. बी. पाटील उपस्थित होते. गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे म्हणाले की, ग्रामसेवक सुरेश मोहिते व महादेव मोहिते यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केले. ग्रामविकासाच्या विविध योजना राबवून विकासाला चालना दिली.
सुरेश मोहिते म्हणाले की, माझी ३७ वर्षांची सेवा मंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्या गावात झाली. त्यामुळे या गावात सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळाले असल्याचे सांगितले.
सरपंच विजय मोहिते यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास सहायक गटविकास अधिकारी एस. एस. लोहार, ग्रामसेवक संदीप कुंभार, अमोल माळी, लीना देशमुख, मनीषा तारळेकर, कृष्णात निकम, हणमंत इंगळे, गणेश मोहिते, राहुल मोहिते यांच्यासह ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक पी. बी. पाटील यांनी आभार मानले.
फोटो : १३ विटा १
मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथे ग्रामसेवक सुरेश मोहिते व महादेव मोहिते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, मालन मोहिते, सरपंच विजय मोहिते, प्रकाश मोरे उपस्थित होते.