ग्रामसचिवालय हेच गावच्या विकासाचे मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST2021-01-13T05:08:58+5:302021-01-13T05:08:58+5:30

कुची (ता. कवठेमहंकाळ) येथील ग्रामसचिवालयाच्या भूमिपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता ...

The Gram Secretariat is the temple of village development | ग्रामसचिवालय हेच गावच्या विकासाचे मंदिर

ग्रामसचिवालय हेच गावच्या विकासाचे मंदिर

कुची (ता. कवठेमहंकाळ) येथील ग्रामसचिवालयाच्या भूमिपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

अजितराव घोरपडे म्हणाले की कुचीत प्रशस्त असे ग्रामसचिवालय होत आहे. ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे.

अनिता सगरे म्हणाल्या. ग्रामसचिवालय हाच गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असून ते सर्वांचेच आधार केंद्र बनावे.

यावेळी सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच विजय पाटील, वसंत माळी, पोलीस पाटील कुमुदिनी ढेरे, संतोष पवार, धनंजय शिंदे, सूरज पाटील, बाबुराव जाधव, बाबुराव सूर्यवंशी, वसंत पवार, ग्रामविकास अधिकारी एम. डी. साळुंखे, संतोष पाटील, आप्पासाहेब पाटील, श्यामजी पाटील उपस्थित होते. बाबुराव सूर्यवंशी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक आप्पासाहेब पाटील यांनी केले. तर ग्रामविकास अधिकारी एम. डी. साळुंखे यांनी आभार मानले.

फोटो-१०घाटनांद्रे१

फोटो ओळ :- कुची (ता कवठेमहंकाळ) येथील ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अनिता सगरे, वैशाली पाटील उपस्थित होते.

Web Title: The Gram Secretariat is the temple of village development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.