अपंगांचा पाच टक्के निधी ग्रामपंचायतींनी द्यावा - सुनील बागडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST2021-09-11T04:26:00+5:302021-09-11T04:26:00+5:30
जत तालुक्यातील सर्वच गावातील अपंग बांधवांना ग्रामपंचायतीतर्फे २०१३ ते २०२० अखेर पाच टक्के निधीचे वाटप झालेले नाही. तालुक्यातील काही ...

अपंगांचा पाच टक्के निधी ग्रामपंचायतींनी द्यावा - सुनील बागडे
जत तालुक्यातील सर्वच गावातील अपंग बांधवांना ग्रामपंचायतीतर्फे २०१३ ते २०२० अखेर पाच टक्के निधीचे वाटप झालेले नाही. तालुक्यातील काही ग्रामसेवक ग्रामपंचायतीस येणारा ५ टक्के अपंग निधी खर्च करीत नाहीत. याबाबत पाठपुरावा केल्यास संबंधित अपंग व्यक्तीस नाहक त्रास देण्यात येतो, अशा तक्रारी प्रहार संघटनेकडे येत आहेत. ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकारी अपंग निधी खर्च करण्याबाबत आडकाठी आणत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करून, अपंग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग हक्क कायद्याची तालुक्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. हा निधी खर्च करण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा आपल्या पंचायत समितीकडे पत्रव्यवहार केला आहे. त्याचाही पंचायत समितीने विचार केलेला नाही. अपंग निधी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर खर्च न केल्यास जत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा बागडे यांनी दिला आहे.
100921\img-20210701-wa0027.jpg
अपंगांचा पाच टक्के निधी ग्रामपंचायतींनी द्यावा
प्रहार संघटनेचे सुनील बागडे यांची मागणी