शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 17:33 IST

पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेले १ हजार २६१ शेतकऱ्यांसह पहिल्या यादीतील अन्य काही शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित

अविनाश कोळीसांगली : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे अडलेले प्रोत्साहन अनुदान आता निवडणुकीनंतर कधी मिळणार, याची प्रतीक्षा जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना लागली आहे. पहिल्या यादी नंतर दुसरी यादी प्रसिद्ध होण्यास तब्बल दोन महिन्यांचा विलंब लागला आहे. त्यामुळे तातडीने पात्र शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला. निवडणूक आचारसंहितेचा फटका कर्जमाफी योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील सुमारे एक लाख शेतकऱ्यांना बसला होता. या शेतकऱ्यांची दुसरी यादी निवड यादी आचारसंहितेमुळे लांबणीवर पडली होती. सुमारे दोन महिने या शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागली.शासनाने नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याच्या योजनेची घोषणा केली होती. महापुराचे अनुदान घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना तसेच तीन वर्षात सलग नव्हे तर कोणत्याही दोन वर्षात कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना यासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थींची संख्या वाढली असल्याचे दिसत आहे.ग्रामपंचायत निवडणुकीचे विघ्नदिवाळीनंतर पात्र सुमारे एक लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर होणार होती. यासाठी गेली काही दिवस शेतकरी प्रतीक्षा करीत होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दुसरी यादी अडकली. आचारसंहितेच्या काळात लाभार्थ्यांचा कोणताही शासकीय योजनेचा लाभ देता येत नाही. त्यामुळे ही यादी आता ग्रामपंचायत निवडणूक संपल्याने जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी सुमारे दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.१२६१ शेतकऱ्यांचा फैसला आजही प्रलंबितचपहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेले १ हजार २६१ शेतकऱ्यांसह पहिल्या यादीतील अन्य काही शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. यासाठी आवश्यक ती ऑनलाइन सुविधा शासनाने अद्याप उपलब्ध न केल्याने या तक्रारी प्रलंबित आहे.शेतकऱ्यांना १८५ कोटी रुपयांचे झाले वाटपअनुदानासाठी जिल्ह्यातील १ लाख ६० हजार ७९५ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती शासनाने पोर्टलवर अपलोड केली होती. त्यातील ६२ हजार ६४२ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करत या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात आला. यातील ५५ हजार शेतकऱ्यांना अनुदानाचे १८५ कोटी रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीgram panchayatग्राम पंचायत