शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: म्हैसाळयोजनेतून शासनाचे पैसे, पाणी वायाच; मुख्य अभियंत्यांना विज्ञान मानेंनी धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 13:38 IST

सुशांत घोरपडे म्हैसाळ : म्हैसाळ योजना गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. म्हैसाळ योजनेच्या कामचुकार, बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे शासनाने लाखो लिटर ...

सुशांत घोरपडे

म्हैसाळ : म्हैसाळ योजना गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. म्हैसाळ योजनेच्या कामचुकार, बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे शासनाने लाखो लिटर पाणी व पैसे वाया जात असून अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सघटक विज्ञान माने यांनी केली. म्हैसाळ योजनेचे वरीष्ठ अधिकारी मुख्य अभियंता एम.एस.जीवने हे दोन दिवस म्हैसाळ योजनेच्या दौरावर होते. यावेळी माने यांनी अनेक प्रश्न विचारत मुख्य अभियंता जीवने यांना धारेवर धरले.म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक एक ते पाच आवर्तन चालवणाऱ्या कामगाराचे गेल्या वर्षाच्या जुलै-आँगस्ट या दोन महिन्याचे पगार आठ महिने दिले गेले नाहीत. एका वर्षात सहा वेळा योजना यांत्रिक विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे ओव्हफ्लो झाली. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. याला जबाबदार कोण? नवीन एचओपीडी पँनल व्हाँल बसवल्यापासून ते व्हाँल फक्त ६५ टक्के उघडता. त्यामुळे त्यातून जेवढा डिचार्च जाणे आवश्यक आहे. तेवढा डिचार्ज पुढच्या टप्प्यावर जात नाही. त्यामुळे टप्पा क्रमांक एक येथे तीन पंप अनावश्यक चालत आहेत. एका पंपाचे विजबिल एका तासाला अडीच हजार रूपये येते. तीन पंपाचे महिन्याकाठी ५० लाख रूपये वीजबिल वाया जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना पाणी पट्टी भरूनही पाणी मिळत नाही. असा गंभीर आरोपही विज्ञान माने यांनी केला.

एम,एस,जीवने हे आमचे वरीष्ठ अधिकारी म्हैसाळ योजनेची पाहणी करण्यासाठी दौरावर आले आहेत. यामध्ये ते संपूर्ण म्हैसाळ योजनेची पाहणी करणार आहेत. - रोहित कोरे, मुख्य कार्यकारी अभियंता -म्हैसाळ योजना  

एम,एस,जीवने हे वरीष्ठ अधिकारी दोन महिन्यात सेवा निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी या दोषी अधिकारी वर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. - विज्ञान माने, जिल्हा सघटक -राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी