राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST2021-09-09T04:31:46+5:302021-09-09T04:31:46+5:30
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊन ते कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. पावणेदहा वाजता कोल्हापूर ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज दौरा
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊन ते कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. पावणेदहा वाजता कोल्हापूर विमानतळ येथे त्यांचे आगमन होणार आहे. सकाळी दहा वाजता शासकीय मोटारीने ते सांगलीकडे रवाना होणार आहेत. सकाळी ११ वाजता माधवनगर रोडवरील सर्किट हाऊस येथे आगमन होणार असून, २० मिनिटे राखीव आहेत. सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी सर्किट हाऊस येथून कसबे डिग्रजकडे जाणार आहेत.
कवठेपिरान रोड, कसबे डिग्रज, सांगली येथे आगमन झाल्यानंतर अभिनेत्री दीपाली सय्यद धर्मादाय संस्थेमार्फत आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यास व मुलींना पन्नास हजार रुपयांच्या मुदत ठेवीच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता ते तिथून पुन्हा सांगलीतील सर्किट हाऊसला येणार आहेत. त्यानंतर २ वाजेपर्यंत ते याठिकाणी थांबणार आहेत. दुपारी ३ वाजता शासकीय मोटारीने ते कोल्हापूर विमानतळावर येणार असून, सव्वातीन वाजता विमानाने ते मुंबईला रवाना होणार आहेत.