शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी शेतकऱ्यांकडून सरकारचे 'महाळ', सांगलीत पाचशे जणांना घातले जेवण 

By अशोक डोंबाळे | Updated: September 27, 2024 19:14 IST

राज्य सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या प्रमुख मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. २७) सांगलीतील स्टेशन चौकात सरकारचे महाळ घातले. तसेच राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उलट-सुलट विधाने करून बाधित शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारचे स्टेशन चौकात महाळ घालून निषेध केला. यावेळी ५०० शेतकऱ्यांना जेवण देण्यात आले. त्याअगोदर प्रभाकर तोडकर यांनी शासनाच्या प्रतीकात्मक प्रतिमेला हार घालून विधिवत पूजा केली. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणा देऊन सरकारचा निषेध करून उपस्थित शेतकऱ्यांना भात, आमटी आणी शिरा असे जेवण दिले. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एका बाजूस महामार्ग रद्द झाला आहे, असे सांगत आहेत. दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्री शिंदे हे फक्त नांदेड, कोल्हापूरचा विरोध आहे, असे विधान करत आहेत. म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णयही घेतला आहे.यावेळी सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, पैलवान विष्णू पाटिल, अभिजित जगताप, प्रवीण पाटील, श्रीकांत पाटील, यशवंत हरुगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, राजेश पाटील, विलास पाटील, धनाजी पाटील आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

नितीन गडकरींना काळे झेंडे दाखविणार : उमेश दशमुखजिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने करून शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. राज्यव्यापी आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. असे असताना मुख्यमंत्र्यांना सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही. म्हणून ४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे, असा इशारा किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीhighwayमहामार्ग