शिराळ्यात शासकीय यंत्रणा सक्षमपणे कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:27 IST2021-05-19T04:27:17+5:302021-05-19T04:27:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यात प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय ...

शिराळ्यात शासकीय यंत्रणा सक्षमपणे कार्यरत
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यात प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय अधिकारी यांचा समन्वय यामुळे कोरोना रुग्णांवर जास्तीत जास्त शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. येथे मिळणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होत आहेत. खाजगी एकच कोविड सेंटर असून, येथे शासकीय दरातच रुग्णांना बिल आकारण्यात येते.
म्युकरमायकोसिससदृश एका रुग्णास येथे जीवदान मिळाले आहे.
मुंबईहून आलेले मोठ्या प्रमाणात नागरिक यामुळे पहिल्या लाटेत रुग्णसंख्या वाढून होते. प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला तालुका कोरोनामुक्त झाला होता.
दुसऱ्या लाटेतही आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, तहसीलदार गणेश शिंदे यांनी योग्य नियोजन केले आहे. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ६ मेट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजन टँक, व्हेंटिलेटर, ७५ ऑक्सिजन बेड याची व्यवस्था केली. आमदार नाईक यांनी स्वतः २५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली. यामुळे १०० ऑक्सिजन बेड झाले, तर कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालयात ३० बेड तयार केले आहेत.
खाजगी स्वस्तिक कोविड सेंटरमध्ये ४० बेडची व्यवस्था आहे. या मुख्य रुग्णालयात बेड उपलब्ध होईपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी २६ ऑक्सिजन बेड तयार केले आहेत.
चौकट
१) ॲक्टिव्ह रुग्ण - ६८२, उपजिल्हा रुग्णालय - ४२, कोकरूड ग्रामीण रुग्णालय - २५, स्वस्तिक कोविड सेंटर - २३, संस्था विलगीकरण कक्ष - ७, खाजगी रुग्णालय - ४, मिरज रुग्णालय - २, गृहविलगीकरण - ५७९
२) आजअखेर एकूण कोरोना रुग्ण - ४६०६, कोरोनामुक्त - ३७७३, मयत - १५१, मृत्यूदर - ३.२७
३) दुसऱ्या लाटेत उपजिल्हा रुग्णालय
एकूण रुग्ण - ३८७, कोरोनामुक्त - २७२, उपचारासाठी पुढे पाठविले - ८२
४) कोकरूड ग्रामीण रुग्णालय-
एकूण रुग्ण - १९६, कोरोनामुक्त - ११८, उपचारासाठी पुढे पाठविले- ५१
५) आमदार मानसिंगराव नाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयात स्वतः २५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे.
६) शासकीय रुग्णालयात उपलब्ध ऑक्सिजन बेड - १५६, स्वस्तिक कोविड सेंटर - ४० बेड.