शासनाने महापुराचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST2021-07-29T04:27:21+5:302021-07-29T04:27:21+5:30
सांगली : जिल्ह्याला महापुराचा नेहमी फटका बसतो. त्यात सर्वसामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने यावर कायमस्वरूपी ...

शासनाने महापुराचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा
सांगली : जिल्ह्याला महापुराचा नेहमी फटका बसतो. त्यात सर्वसामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जमियत उलेमा ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चाैधरी यांच्याकडे केली.
जमियत उलेमा ए-हिंदच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. कृष्णा नदीला आलेल्या महापुरात मोठे नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेली मदत वेळेवर द्यावी. पाणी ओसरताच स्थानिक प्रशासनाने पंचनामे करावेत. नुकसान झालेल्यांना ठोस भरपाई द्यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
२०१९ मधील महापुरात जमियत उलेमा ए-हिंदने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य उभारले हाेते. सध्या कोरोनाकाळातच महापुराचा फटका बसला आहे. अजूनही बऱ्याच भागात पुराचे पाणी आहे. पाणी ओसरू लागताच जमियतची सांगली शाखा मदत कार्य सुरु करत असल्याचे मौलाना नदीम सिद्दीकी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जमियत उलेमा ए-हिंदचे सांगली जिल्हाध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल, जमियतचे जिल्हा कार्याध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, सांगली शहर उपाध्यक्ष सुफियान पठाण, मौलाना जुबेर, हाफिज मुश्ताक उपस्थित होते.