अल्पसंख्याकांना शासनाने अर्थपुरवठा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:20+5:302021-09-26T04:28:20+5:30
सांगली : मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळामधून अल्पसंख्याकांना कर्जस्वरूपात आर्थिक मदत करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा ...

अल्पसंख्याकांना शासनाने अर्थपुरवठा करावा
सांगली : मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळामधून अल्पसंख्याकांना कर्जस्वरूपात आर्थिक मदत करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकारी मोसमी बर्डे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आझाद महामंडळामध्ये अल्पसंख्याक लोकांच्या उद्योग व व्यवसायासाठी मागील सरकारने एक रुपयाही दिलेला नाही. महाविकास आघाडी सरकारने तरी याबाबत निर्णय घ्यावा. शैक्षणिक कर्ज मर्यादा ५ लाखांवरून २० लाखांपर्यंत करण्यात यावी, उद्योग व व्यवसायासाठी कर्ज योजना तत्काळ सुरू करण्यात येऊन ती नियमित करण्यात यावी. मागण्या मान्य न झाल्यास आघाडीकडून जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, उमरफारुक ककमरी, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, विकास कोलप, विनोद कदम, प्रमोद मल्लाडे आदींची यावेळी उपस्थिती होती.