शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरज शासकीय दूध डेअरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर, जागेत शासकीय कार्यालये होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:31 IST

वर्षापासून डेअरीचे कामकाज पूर्णपणे बंद

सदानंद औंधेमिरज : मिरजेतील बंद पडलेल्या शासकीय दूध डेअरीच्या जागेवर मिरज पोलिस ठाणे व तहसीलदार कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ६५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली मिरजेतील शासकीय डेअरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.मुंबईनंतर सर्वात मोठी असलेली मिरजेतील शासकीय डेअरी गेल्या १५ वर्षांपासून बंद आहे. १९५७ साली स्थापन झालेल्या मिरजेच्या शासकीय दूध डेअरीत सुमारे दोन लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा होती. कालबाह्य झालेल्या या यंत्रणेची भंगारात विक्री झाली आहे. मिरज शहरालगत शासकीय दूध डेअरीची ४४ एकर जागा आहे. डेअरी बंद असल्याने या जागेपैकी आठ एकर जागा महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे व कर्मचारी वसाहतीसाठी मागण्यात आली आहे. मिरज तहसीलदार कार्यालय व न्यायालयासाठीही या जागेची मागणी आहे.

आगामी काळात डेअरीची जागा शासकीय कार्यालयांना देण्यात येणार असल्याने शासकीय दूध डेअरी इतिहासजमा होणार आहे. राज्यातील बंद अवस्थेतील शासकीय दूध योजना पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.मिरजेतील दूध डेअरीतून एकेकाळी दररोज एक्स्प्रेसला जोडून रेल्वे वॅगनमधून दूध मुंबईला पाठविण्यात येत होते. यासाठी डेअरीपर्यंत रेल्वे रूळ होते. काही काळ मराठवाड्यात अतिरिक्त होणारे दूध येत होते. डेअरी बंद पडल्यावर या दुधावर जिल्ह्यातील अन्य सहकारी दूध डेअरींमध्ये प्रक्रिया करण्यात येत होती.मात्र, गेल्या वर्षापासून मराठवाड्यातून येणारे दूधही बंद झाल्याने शासकीय दूध डेअरीचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे. शासकीय दूध डेअरी आता पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. डेअरी बंद असल्याने इमारतीला अवकळा आली आहे. त्यामुळे मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेचा शासकीय कार्यालयांसाठी वापर करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

आठ एकर जागेची पोलिसांची मागणी..मिरज डेअरीच्या जागेतील आठ एकर जागा पोलिस ठाणे व कर्मचारी वसाहतीसाठी मागणीचा प्रस्ताव पाठवला आहे. पोलिस ठाण्यासाठी ही जागा सोयीची असल्याचे महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजmilkदूधGovernmentसरकार