पाच दिवस शासकीय कार्यालये बंद
By Admin | Updated: October 21, 2014 23:45 IST2014-10-21T22:04:14+5:302014-10-21T23:45:47+5:30
अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये मात्र फिलगुडचे वातावरण

पाच दिवस शासकीय कार्यालये बंद
सांगली : बुधवारपासून जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये सोमवार दि. २७ पर्यंत शासकीय सुट्टी असल्यामुळे बंद राहणार आहेत. पाच दिवस कार्यालये बंद राहणार असल्यामुळे नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. तसेच गुरुवारी आणि शुक्रवारी शासनानेच दीपावलीची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर चौथा शनिवार असल्यामुळे सुट्टी आणि रविवारी हॉली डे आहे. त्यामुळे सलग पाच दिवस शासकीय कार्यालये बंद राहणार असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. परंतु, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये मात्र फिलगुडचे वातावरण आहे.(प्रतिनिधी)