शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मिरजेतील शासकीय दूध योजनेमधील कर्मचाऱ्यांना दहा कोटी थकबाकी मिळणार, ३५ वर्षांच्या संघर्षाला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 14:20 IST

गेली ३५ वर्षे थकित देणी मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरू होता.

मिरज : मिरजेतील शासकीय दूध योजनेच्या ४६ निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत असलेली २५ कोटी रुपयांची देणी भागविण्यासाठी शासनाने १२ कोटी ८१ लाख रुपये निधी मंजूर करून दहा कोटी रुपये अनुदान शासकीय दूध योजनेकडे वर्ग केले आहे. उर्वरीत १५ कोटी रुपयेही टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत.लाभधारक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात देय रक्कम थेट वर्ग करण्याचे आदेश शासनाच्या उपसचिवांनी दूध योजनेच्या प्रशासनाला दिले आहेत. मिरज शासकीय दूध योजना बंद पडल्याने डेअरीतून निवृत्त ४६ कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी, महागाई भत्ता, सातवा वेतन आयोगाच्या आर्थिक लाभाची रक्कम थकित आहे. यासाठी न्यायालयात लढा देणाऱ्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही नोकरीत सामावून घेण्यात आले नाही.गेली ३५ वर्षे थकित देणी मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरू होता. संकल्प फाउंडेशनचे सदस्य विवेक जिरनाळे यांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. आता राज्य शासनाने निवृत्त कर्मचाऱ्यांची थकित देणी देण्यासाठी पहिल्या टप्प्यात १२ कोटी ८१ लाख रुपये अनुदानास मान्यता देऊन दहा कोटी रुपये शासकीय दूध योजनेकडे वर्ग केले आहेत. संबंधित लाभार्थी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर थकीत रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

४६ पैकी १८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, २८ कर्मचारी सध्या यात आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात हयात कर्मचाऱ्यांची देणी देण्यात येणार आहेत. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास सूचना दिल्या आहेत. उर्वरीत निधी मिळाल्यानंतर त्यांचीही प्रकरणे निकालात काढण्यात येतील, असे शासकीय दूध योजनेच्या कार्यालयीन अधिक्षिका अर्चना सर्वदे यांनी सांगितले.

४६ कर्मचाऱ्यांना न्यायदूध डेअरीच्या ४६ कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करून सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याची मागणी १९८६ साली तत्कालीन दूध योजना प्रशासनाने फेटाळली होती. या विरुद्ध संबंधित ४६ कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. औद्योगिक न्यायालयाने जुलै १९९१ मध्ये संबंधित कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्याचे आदेश दिले. औद्योगिक न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध दूध योजना प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयानेही औद्योगिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. मात्र, न्यायालयाच्या निकालानंतर काही महिन्यांतच हे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांची देणी प्रलंबित होती. आता ३५ वर्षाच्या संघर्षानंतर कामगारांना त्यांची देणी मिळणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजmilkदूध