बामणोलीतील विवेकानंद हॉस्पिटलचा शासनाकडून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:30 IST2021-08-19T04:30:02+5:302021-08-19T04:30:02+5:30
फोटो - १८ कुपवाड १ फोटो ओळ : बामणोली (ता. मिरज) येथील विवेकानंद हॉस्पिटलचे डॉ. राम लाडे यांना पालकमंत्री ...

बामणोलीतील विवेकानंद हॉस्पिटलचा शासनाकडून सन्मान
फोटो - १८ कुपवाड १
फोटो ओळ : बामणोली (ता. मिरज) येथील विवेकानंद हॉस्पिटलचे डॉ. राम लाडे यांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शासनाकडून प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, डॉ. पारिजात बाजी, डॉ. शिवानंद कोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : कोविडच्या कालावधीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्वात जास्त रुग्णांना उपचार देऊन रुग्णसेवा केल्याबद्दल सांगली जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल’ म्हणून बामणोली (ता. मिरज) येथील विवेकानंद हॉस्पिटलला पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आल्याची माहिती डॉ. राम लाडे यांनी पत्रकारांना दिली.
डॉ. लाडे म्हणाले की, कोरोनाच्या डेडिकेटेड हॉस्पिटलच्या वर्गवारीत समावेश असलेल्या बामणोलीतील विवेकानंद हॉस्पिटलने कोरोनाच्या कालावधीत अतिशय चांगले काम केले. हॉस्पिटलने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत तेराशेहून अधिक रुग्णांना कोरोनाचे उपचार देऊन चांगली रुग्णसेवा केली आहे. हॉस्पिटलने कोरोना रूग्णांना मोफत अन्नसेवा देतानाच औषधोपचार केले आहेत. हॉस्पिटलचा मृत्यू दर (डेथ रेट)ही कमी आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ यांच्यासह हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.
या कामाची दखल घेऊन शासनाकडून विवेकानंद हॉस्पिटलचे डॉ. राम लाडे यांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शासनाकडून प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, डॉ. पारिजात बाजी, डॉ. शिवानंद कोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे आदी उपस्थित होते.