सांगलीत गणपती पंचायत ट्रस्टतर्फे सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST2021-09-11T04:26:51+5:302021-09-11T04:26:51+5:30

सांगलीत श्री गणपती पंचायत ट्रस्टतर्फे संस्थानच्या गणेशोत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी राजलक्ष्मी पटवर्धन ...

Government Ganpati installation by Sangli Ganpati Panchayat Trust | सांगलीत गणपती पंचायत ट्रस्टतर्फे सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना

सांगलीत गणपती पंचायत ट्रस्टतर्फे सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना

सांगलीत श्री गणपती पंचायत ट्रस्टतर्फे संस्थानच्या गणेशोत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी राजलक्ष्मी पटवर्धन यांच्यासह परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

(छाया सुरेंद्र दुपटे)

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : श्री गणपती पंचायत ट्रस्टच्या सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना शुक्रवारी साध्या पद्धतीने करण्यात आली. कोणताही शाही लवाजमा न घेता श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या हस्ते श्रींची पूजा करून सरकारी उत्सवाला सुरुवात झाली.

राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये पारंपरिक सरकारी गणपती विराजमान करण्यात आला. गणपती पंचायत संस्थानतर्फे पाच दिवसांचा सरकारी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दरवर्षी उत्सवाचा शाही सोहळा असतो, पण यावर्षी कोरोना, लॉकडाऊन आणि महापुरामुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला जात आहे. प्रतिष्ठापनेवेळी संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, राजलक्ष्मी पटवर्धन आणि परिवाराकडून विधिवत पूजा झाली. यावेळी संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी पटवर्धन परिवाराने गणरायाचरणी प्रार्थना केली. सांगलीकरांनीही नियमांचे पालन करीत उत्सव साजरा करण्याचे आवाहन विजयसिंह राजे पटवर्धन यांनी केले.

Web Title: Government Ganpati installation by Sangli Ganpati Panchayat Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.