शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाणार, 'त्यांनाच' मतदान करण्याचाही निर्धार 

By अशोक डोंबाळे | Updated: November 8, 2023 15:31 IST

सांगलीतील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात निर्णय 

सांगली : राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीने जुनी पेन्शन मिळावी, या मागणीसाठी राज्यव्यापी बेमुदत संप मार्च २०२३ केला होता. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी आश्वासन देऊनही जुनी पेन्शन लागू न झाल्यामुळे दि. १४ डिसेंबरपासून पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना तसे निवेदनही दिले आहे.सांगलीतीलआंदोलनाचे नेतृत्व समन्वय समितीचे निमंत्रक पी. एन. काळे, डी. जी. मुलाणी, गणेश धुमाळ, संजय व्हनमाने, मिलिंद हारगे, जाकीरहुसेन मुलाणी, शक्ती दबडे, शिक्षक संघटनेचे सयाजी पाटील, राजेंद्र नागरगोजे, बाबासाहेब लाड, सुधाकर माने, मारुती शिरतोडे, अरविंद जैनपुरे, ओंकार कांबळे, विजय कांबळे, हाजीसाब मुजावर यांनी केले. समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले. सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाही दिल्या.समन्वय समितीचे निमंत्रक पी. एन. काळे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन देऊन सहा महिने झाले आहेत. तरीही शासनाने जुन्या पेन्शनबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शासनाला इशारा म्हणून राज्यातील कामगार, कर्मचारी आणि शिक्षकांनी बुधवारी आंदोलन केले आहे. ६ नोव्हेंबरला राज्याचे मुख्य सचिवांच्या दालनामध्ये समन्वय समितीला चर्चेसाठी बोलविले होते. परंतु त्यातून कोणताही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी दि. १४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संप करण्याचा निर्धार सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

पेन्शन नाही तर मतदान नाहीसरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षाच्या जाहीरनाम्यात जुन्या पेन्शनचा समावेश असेल त्यांनाच मतदान करण्याचाही निर्धार केला आहे. जाहीरनाम्यात जुन्या पेन्शनचा समावेश नसेल तर त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समन्वय समितीचे निमंत्रक पी. एन. काळे यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारagitationआंदोलनPensionनिवृत्ती वेतन