सांगलीतून पंतप्रधानांना पाठवल्या गोवऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:14+5:302021-09-05T04:30:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गॅस सिलिंडरचे दर सहा महिन्यात दुप्पट झाल्याने या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने चूल ...

सांगलीतून पंतप्रधानांना पाठवल्या गोवऱ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गॅस सिलिंडरचे दर सहा महिन्यात दुप्पट झाल्याने या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने चूल पेटवून महिलांनी निदर्शने केली. वाढत्या महागाईकडे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगलीतून रजिस्टर पोस्टाने गोवऱ्याही पाठवल्या.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष डॉ. छाया जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी छाया जाधव म्हणाल्या की, या दरवाढीविरोधात आम्ही सतत आंदोलने करत आहोत, पण केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. या दरवाढीमुळे सर्वसामान्य महिलांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. त्यांना आता गॅसऐवजी शेणाच्या गोवऱ्यांवर स्वयंपाक करावा लागत असल्याने या गोवऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवल्या आहेत. गोवऱ्या मिळाल्यानंतर तरी मोदींना महागाईची कल्पना येईल व ते गॅसचे दर कमी करतील, अशी अपेक्षा आहे.
या आंदोलनात अनिता पांगम, आयेशा शेख, अमृता सरगर, वंदना सूर्यवंशी, रंजना व्हावळ, वैशाली सूर्यवंशी, शकुंतला हिंगमीरे, सोनाली सूर्यवंशी, रुक्मिणी सूर्यवंशी, सोनाली कुकडे, उषा पाटील, मीना आरते, सुनीता कुकडे, सविता सरगर, पूजा थोरात, सारिका सरगर, रेखा सूर्यवंशी, शोभा शिंदे, नेहा सूर्यवंशी, माधुरी सूर्यवंशी, योगिता सूर्यवंशी आदी महिला सहभागी झाल्या होत्या.
चौकट
भाजप, मोदींविरुद्ध घोषणा
‘मोदी मतलब महंगाई’, ‘बहोत हो गयी महंगाई की मार, अब की बार भाजप हद्दपार’ अशा घोषणा देत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महागाईबद्दल संताप व्यक्त केला.