गोटखिंडीत पोलीस आले की दुकाने बंद, गेले की पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST2021-04-20T04:27:44+5:302021-04-20T04:27:44+5:30
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) ग्रामपंचायतकडून कोरोना प्रतिबंध ग्रामसमितीत बैठक होऊन गावातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवारी सकाळी ...

गोटखिंडीत पोलीस आले की दुकाने बंद, गेले की पुन्हा सुरू
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) ग्रामपंचायतकडून कोरोना प्रतिबंध ग्रामसमितीत बैठक होऊन गावातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५पर्यंत ठेवण्याबाबत निर्णय झाला आहे. बिगर मास्क फिरणे, कामाशिवाय फिरणे, गर्दी करून थांबणे यासाठी आष्टा पोलीस गावातून फिरत असतात. परंतु पोलीस आले की, पळून जाणे, काही तरी कारणे सांगून वेळ मारून नेण्याचे प्रकार सुरू असतात.
येथील दुकानदारांना वेळेचे बंधन घालून दिले असतानाही अनेक दुकाने वेळेच्या आधीच सुरू असतात, पोलीस आले की दुकाने बंद, गेले की परत सुरू असतात. नियमावली बाजूला ठेवून त्यांचा उद्योग सुरू असतो. शुक्रवारी ग्रामपंचायतमध्ये बैठक होऊन अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येऊन सोमवार ते शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने सुरू ठेवावेत, अशी समज देण्यात येत आहे. संबंधिताना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या नोटिसांचा भंग करून व शासनाचे नियम बाजूला करत काही दुकानदार वेळेनंतर दुकाने सुरू ठेवत आहेत. एकाने दुकान उघडले की, दुसऱ्यानेही सुरू करायचे, असा प्रकार सुरू आहे. ग्रामपंचायत व समितीने लक्ष घालून नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, अशी मागणी होत आहे.