गोटखिंडी-भडकंबे रस्ता रोखला; दुरुस्तीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:22+5:302021-06-10T04:19:22+5:30
गोटखिंडी : गोटखिंडी-भडकंबे रस्त्यावरील नाईक वस्तीजवळ मुरुम उत्खनन व खडीच्या अवजड वाहनांमुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून अनेक अपघात ...

गोटखिंडी-भडकंबे रस्ता रोखला; दुरुस्तीचे आश्वासन
गोटखिंडी : गोटखिंडी-भडकंबे रस्त्यावरील नाईक वस्तीजवळ मुरुम उत्खनन व खडीच्या अवजड वाहनांमुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून अनेक अपघात झाले आहेत. पंधरा दिवसापासून दुरुस्तीबाबत टोलवाटोलवी सुरू असल्याने बुधवारी ग्रामस्थांनी मुरुम, खडी वाहतूक करणारे डम्पर अडविल्यानंतर दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन मिळाले.
येथील संतोषगिरी डोंगराच्या उत्तर बाजूकडील भडकंबे, पोखर्णी डोंगर परिसरात दगड, मुरुम उत्खनन सुरू आहे. तेथे क्रशरही आहे. तेथून मुरुम व खडी वाहतूक करण्यासाठी मोठमोठे डम्पर आहेत. त्याची वाहतूक गोटखिंडीतून होत असल्याने रस्त्याची वाट लागली आहे. नाईक वस्तीजवळ मोठे खड्डे पडले आहेत. त्यातून मोटरसायकल घसरून अनेक अपघात झाले आहेत. याबाबत ग्रामपंचायतकडून संबंधित प्लॉटधारकांना वेळोवेळी सांगूनही खड्डे बुजविण्याबाबत टोलवाटोलवी करीत होते. बुधवारी ग्रामपंचायत सदस्याची चारचाकी त्या खड्ड्यात अडकल्याने त्यांनी व तरुणांनी डम्पर रोखल्याने रस्ता दुरुस्त करून देण्याचे आश्वासन मिळाले.