पेठ येथील गुंड मोहन मदने हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:13+5:302021-02-06T04:48:13+5:30
इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील उमाजीनगर परिसरातील गुन्हेगार मोहन काशीनाथ मदने (वय ४३) याला येथील प्रांताधिकारी नागेश पाटील ...

पेठ येथील गुंड मोहन मदने हद्दपार
इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील उमाजीनगर परिसरातील गुन्हेगार मोहन काशीनाथ मदने (वय ४३) याला येथील प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी वाळवा-शिराळा तालुक्यातून नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार पोलिसांनी मदने याला ताब्यात घेऊन त्याची कराड तालुक्यामध्ये रवानगी केली.
मोहन मदन ऊर्फ एमएम याच्याविरुद्ध पोलिसात खुनाचा प्रयत्न, महिलांची छेडछाड करणे, घातक शस्रानिशी हल्ला करणे, दहशत माजविणे, बेकायदा सावकारी आणि खंडणी वसुली अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी मदने याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस प्रमुखांमार्फत येथील प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यावर सुनावणी होऊन मदने याच्या हद्दपारीचे आदेश काढले. त्याच्या हद्दपारीच्या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस नाईक शरद जाधव, प्रशांत देसाई, उत्तम माळी, सचिन सुतार यांनी भाग घेतला.
फोटो - ०४०२२०२१-आयएसएलएम- मोहन मदने