सरत्या वर्षाला घरातूनच निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST2021-01-02T04:22:29+5:302021-01-02T04:22:29+5:30

सांगली : ‘थर्टी फर्स्ट’ अधिक झोकात साजरा करत नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांच्या उत्साहावर यंदा कोरोनाने मर्यादा आणल्या. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार ...

Goodbye from home last year! | सरत्या वर्षाला घरातूनच निरोप!

सरत्या वर्षाला घरातूनच निरोप!

सांगली : ‘थर्टी फर्स्ट’ अधिक झोकात साजरा करत नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांच्या उत्साहावर यंदा कोरोनाने मर्यादा आणल्या. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्यात पोलिसांनी रात्री लागू केलेल्या संचारबंदीमुळे सर्वांना घरात थांबूनच नववर्षाचे स्वागत करावे लागले. संचारबंदी व मार्गशीर्षमुळे ना पार्टीची झिंग ना रात्रीच्या बाराच्या ठोक्याला आतषबाजी... अशा वातावरणात नववर्षाचे स्वागत दिसून आले.

सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप देत तितक्याच उत्साहात नववर्षाचे स्वागत केले जाते. सायंकाळी सुरू झालेला उत्साह रात्री बारापर्यंत सुरूच राहतो. दरवर्षी रात्री उशिरापर्यंत थर्टी फर्स्टचा उत्साह दिसून येतो. यंदा मात्र कोरोनामुळे सर्वच उत्साहावर मर्यादा आल्या आहेत. सध्या कोरोनाचा कहर आटोक्यात येत दिलासादायक वातावरण तयार होत असले तरी खबरदारी म्हणून प्रशासनाने अनेक निर्बंध आणले आहेत. त्यानुसार रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधित पोलिसांचा कडा पहारा कायम होता. त्यामुळे रात्री बाराला होणारी आतषबाजी व रपेटीसह जल्लोष करता येणार नसला तरी, अनेकांनी घरात राहूनच नववर्षाचे स्वागत करण्याचे नियोजन केले होते.

चौकट

संचारबंदी, त्यात मार्गशीर्ष गुरुवार

संचारबंदीमुळे अगोदरच बाहेर जल्लोष साजरा करण्यावर मर्यादा आल्या असताना, थर्टी फर्स्ट गुरुवारी आल्याने अनेकांच्या घरी उपवास व पूजा असल्याने चमचमीत मांसाहारी जेवणावर ताव मारण्याऐवजी पनीर डीशवर समाधान मानून नववर्षाचे स्वागत करावे लागले.

Web Title: Goodbye from home last year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.