चांगल्या कामाची दखल घेतली जाते : नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:24+5:302021-09-02T04:58:24+5:30

कोकरुड : शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रमांचा अवलंब करून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी जे शिक्षक काम करतात, त्यांची ...

Good work is noticed: Naik | चांगल्या कामाची दखल घेतली जाते : नाईक

चांगल्या कामाची दखल घेतली जाते : नाईक

कोकरुड : शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रमांचा अवलंब करून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी जे शिक्षक काम करतात, त्यांची प्रशासनाकडून निश्चितपणे दखल घेतली जाते, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.

मणदूर (ता. शिराळा) येथील रमण दगडू खबाले यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

नाईक म्हणाले, शिक्षकांनी आपल्या शाळेच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले; तर निश्चितपणे आपल्या शाळेचे नाव राज्यभर चमकायला वेळ लागणार नाही.

यावेळी सहायक गटविकास अधिकारी अरविंद माने, विस्ताराधिकारी प्रकाश शिंदे, लताताई खबाले, वैभव माळी, प्रतीक खबाले आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Good work is noticed: Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.