शिराळा तालुक्याचे कोरोना काळात चांगले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:26 IST2021-05-24T04:26:14+5:302021-05-24T04:26:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा डोंगरी तालुका असला तरी येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तालुक्याचे कोरोना काळात ...

Good work during the Corona period of Shirala taluka | शिराळा तालुक्याचे कोरोना काळात चांगले काम

शिराळा तालुक्याचे कोरोना काळात चांगले काम

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा डोंगरी तालुका असला तरी येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तालुक्याचे कोरोना काळात खूप चांगले काम सुरू आहे, असे प्रतिपादन मुंबई आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी केले.

येथील उपजिल्हा रुग्णालयास डॉ. तायडे यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी मांगले प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही भेट देऊन कोरोना कामकाज, तसेच सर्व राष्ट्रीय आरोग्य कामकाजाचा आढावा घेतला.

उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जमाल मोमीन, डॉ. नितीन जाधव, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. मनोज महिंद, डॉ. अजय पाटील, डॉ. मयूरी राजमाने, डॉ. ओंकार पाटील, दीपक चिलवंत, आदी उपस्थित होते.

Web Title: Good work during the Corona period of Shirala taluka