चांगले ग्रंथवाचन जीवन समृद्ध करते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:20+5:302021-08-26T04:28:20+5:30
इस्लामपूर येथील निशात उर्दू वाचनालयाच्या कार्यक्रमात कवी प्रदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आबीद मोमीन, मुनीर पटवेकर, डॉ. मोहसीन ...

चांगले ग्रंथवाचन जीवन समृद्ध करते
इस्लामपूर येथील निशात उर्दू वाचनालयाच्या कार्यक्रमात कवी प्रदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आबीद मोमीन, मुनीर पटवेकर, डॉ. मोहसीन मुजावर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : प्रतिभावंतांनी निर्माण केलेल्या ग्रंथांच्या वाचनामधून मानवी जीवनातील विविध प्रकारचे अनुभव येतात. त्यामुळे जीवनाकडे बघण्याची दृष्टी व्यापक होऊन अभिरुची विकसित होते. म्हणून उत्तम ग्रंथांचे वाचन जीवन समृद्ध करते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रदीप पाटील यांनी केले.
येथील निशात उर्दू लायब्ररीच्या वतीने आयोजित केलेल्या आदर्श वाचक आणि विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रा. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कोविडयोद्धा डॉ. मोहसीन मुजावर अध्यक्षस्थानी होते. यावेळी नसीमुलगणी पटवेकर, मुनीरभाई पटवेकर, आबीद मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, समाजव्यवस्थेचा इतिहास आणि वर्तमान समजून घेण्याच्या दृष्टीने वाचन खूप महत्त्वाचे आहे. आज भाैतिक सुखाच्या मोहात गुरफटलेल्या माणसांच्या मनामध्ये सहानुभाव, करुणा जागृत होऊन समाजात मानवता वाढीस लागण्यासाठी ग्रंथवाचनाला पर्याय नाही.
डॉ. मुजावर यांनी कोरोनाच्या काळात काळजी घेण्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सचिव अनिस मोमीन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बर्कतुल्ला मोमीन यांनी आभार मानले. जावेद इबुसे, नदीम पटवेकर, जहूर पटवेकर, फारुक मोमीन, हनीफ मुल्ला, ग्रंथपाल आसमा तांबोळी उपस्थित होत्या.