गोमटेश पतसंस्थेचा १२ टक्के लाभांश जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:52 IST2021-02-28T04:52:05+5:302021-02-28T04:52:05+5:30

इस्लामपूर : येथील गोेमटेश नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष महावीर साधू यांनी केली. पतसंस्थेच्या ...

Gomtesh Patsanstha announces 12% dividend | गोमटेश पतसंस्थेचा १२ टक्के लाभांश जाहीर

गोमटेश पतसंस्थेचा १२ टक्के लाभांश जाहीर

इस्लामपूर : येथील गोेमटेश नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याची घोषणा अध्यक्ष महावीर साधू यांनी केली. पतसंस्थेच्या सभागृहात साधू यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.

यावेळी साधू यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत प्रगतीची माहिती दिली. संस्थेकडे २५ कोटी रुपयांच्या ठेवी आणि १७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारी संचालक संजय कबुरे यांनी अहवाल वाचन केले. व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

शैक्षणिक व इतर क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी आणि व्यक्तींचा गोमटेश सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कोरोना काळात गोमटेश आधार फाऊंडेशनसाठी आॅक्सिजन सिलिंडर देणाऱ्या मयूर ढबू आणि बाहुबली वाकळे यांचा सत्कार करण्यात आला. राजू देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुरेश कबुरे यांनी आभार मानले.

यावेळी शीतल राजमाने, सुभाष राजमाने, राजेंद्र ढबूू, किरण शेटे, महावीर बापुळे, राजेंद्र पाटील, अभंग भाेजने, सुरेश खवळे, सुजाता करांडे, पद्मश्री दांड, सुनील पाटील, सुनील हवालदार उपस्थित होते.

Web Title: Gomtesh Patsanstha announces 12% dividend