बलात्कार, अपहरणातील गोळेवाडीच्या युवकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:37+5:302021-03-13T04:48:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्याविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाललैंगिक ...

Golewadi youth arrested for rape, abduction | बलात्कार, अपहरणातील गोळेवाडीच्या युवकास अटक

बलात्कार, अपहरणातील गोळेवाडीच्या युवकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्याविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून येथील न्यायालयाने त्याला १७ मार्चपर्यंत सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

प्रदीप हणमंत गावडे (वय २१, रा. गोळेवाडी-पेठ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने फिरावयास जाण्याचे आमिष दाखवीत १४ वर्षे ५ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस सोमवारी पळवून नेले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. मुलीच्या पालकांनी पोलिसात तिचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली होती. सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करत संशयित प्रदीप गावडे याला अटक केली.

Web Title: Golewadi youth arrested for rape, abduction