टोमॅटोला यंदा सोन्याचा भाव
By Admin | Updated: June 16, 2016 01:08 IST2016-06-15T23:32:10+5:302016-06-16T01:08:24+5:30
किलोला शंभर रुपये : ‘लाल चिखल’ नव्हे, ‘लाल सोने’!

टोमॅटोला यंदा सोन्याचा भाव
सांगली : तीव्र पाणीटंचाई व बेभरवशाच्या बाजारपेठेमुळे शेतकरी घायकुतीला आला असतानाच, दरवर्षी मातीमोल दराने विकण्याची वेळ येणाऱ्या टोमॅटोला यंदा मात्र सोन्याचा भाव आला आहे. उत्पादनात झालेली घट व मागणी वाढल्याने सध्या शहरातील बाजारात टोमॅटोला किलोला ८० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. अजून महिनाभर असाच चढा दर कायम राहील, असा विश्वास मिरज पूर्व भागातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनात आघाडी घेत असलेल्या मिरज पूर्व भागात यंदा ‘लॉटरी’ म्हणून घेतलेले टोमॅटोचे पीक चांगलेच साधले आहे. चाबुकस्वारवाडी, सलगरे, बेळंकी, लिंगनूर, खटाव आदी गावांमध्ये भाजीपाल्याचे मोठे क्षेत्र असून बहुतांश शेतकरी बाजाराच्या मागणीनुसार भाजीपाला उत्पादन घेतात. सध्या या भागात मिरज, सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, कऱ्हाड, पनवेलसह इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा टोमॅटो खरेदीसाठी राबता आहे.
भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक धोकादायक पीक म्हणून टोमॅटो ओळखला जातो. दर मिळाला तर ठिक, नाही तर तो फेकून देण्याची वेळ येत असल्याने बहुतांश शेतकरी या पिकाकडे वळत नाहीत. मात्र, पूर्व भागातील खटाव, लिंगनूर भागात यंदा टोमॅटोचे घेण्यात आलेले उत्पादन फलदायी ठरले आहे. टोमॅटोचे पीकही नाजूक असल्याने थोड्याशा वाऱ्यामुळे प्लॉट जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
टोमॅटोला यंदा सोन्याचा भाव
किलोला शंभर रुपये : ‘लाल चिखल’ नव्हे, ‘लाल सोने’!
सांगली : तीव्र पाणीटंचाई व बेभरवशाच्या बाजारपेठेमुळे शेतकरी घायकुतीला आला असतानाच, दरवर्षी मातीमोल दराने विकण्याची वेळ येणाऱ्या टोमॅटोला यंदा मात्र सोन्याचा भाव आला आहे. उत्पादनात झालेली घट व मागणी वाढल्याने सध्या शहरातील बाजारात टोमॅटोला किलोला ८० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. अजून महिनाभर असाच चढा दर कायम राहील, असा विश्वास मिरज पूर्व भागातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनात आघाडी घेत असलेल्या मिरज पूर्व भागात यंदा ‘लॉटरी’ म्हणून घेतलेले टोमॅटोचे पीक चांगलेच साधले आहे. चाबुकस्वारवाडी, सलगरे, बेळंकी, लिंगनूर, खटाव आदी गावांमध्ये भाजीपाल्याचे मोठे क्षेत्र असून बहुतांश शेतकरी बाजाराच्या मागणीनुसार भाजीपाला उत्पादन घेतात. सध्या या भागात मिरज, सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, कऱ्हाड, पनवेलसह इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा टोमॅटो खरेदीसाठी राबता आहे.
भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक धोकादायक पीक म्हणून टोमॅटो ओळखला जातो. दर मिळाला तर ठिक, नाही तर तो फेकून देण्याची वेळ येत असल्याने बहुतांश शेतकरी या पिकाकडे वळत नाहीत. मात्र, पूर्व भागातील खटाव, लिंगनूर भागात यंदा टोमॅटोचे घेण्यात आलेले उत्पादन फलदायी ठरले आहे. टोमॅटोचे पीकही नाजूक असल्याने थोड्याशा वाऱ्यामुळे प्लॉट जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांत खुशी, ग्राहकांत गम
रोजच्या आहारात टोमॅटोला महत्त्व असल्याने ग्राहकांकडून नेहमीच खरेदीला प्राधान्य असते. मात्र, यंदा दर ऐंशी ते शंभरावर जाऊन पोहोचल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. याउलट शेतकऱ्यांनी यंदा चांगला दर मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.
अडचणींवर मात करून थोडे धाडसानेच यंदा टोमॅटोचे उत्पादन घेतले असून चांगला दर मिळत असल्याने समाधानी आहे. सध्या दिवसआड तोड घेत असून मुंबई बाजारपेठेत माल पाठविला जात आहे. सध्या ६५ ते ७२ रुपयांपर्यंत दर मिळाला असला तरी, अजून दर मिळण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत टोमॅटोची आवक कमी असल्याने अजून जादा दर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- सुखदेव कोरे, टोमॅटो उत्पादक,
बिब्बी मळा, बेळंकी (ता. मिरज).