माळवाडी शाळेच्या सहा विद्यार्थ्यांना सुवर्णबाण पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:26 IST2021-05-24T04:26:01+5:302021-05-24T04:26:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : माळवाडी (ता. पलूस) शाळेतील राजे शिवछत्रपती कब पथकातील सहा विद्यार्थ्यांना सुवर्णबाण हा राज्य ...

Gold arrow award to six students of Malwadi school | माळवाडी शाळेच्या सहा विद्यार्थ्यांना सुवर्णबाण पुरस्कार

माळवाडी शाळेच्या सहा विद्यार्थ्यांना सुवर्णबाण पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

भिलवडी : माळवाडी (ता. पलूस) शाळेतील राजे शिवछत्रपती कब पथकातील सहा विद्यार्थ्यांना सुवर्णबाण हा राज्य स्काऊट आणि गाईडमधील कब विभागातील पुरस्कार जाहीर झाला आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये सुवर्णबाण पुरस्कार मिळविणारी जिल्हा परिषदेची पलूस तालुक्यातील ही एकमेव शाळा आहे. सोनतळी, कोल्हापूर येथे चतुर्थ चरण चाचणी परीक्षा झाली होती. राजवर्धन खुबीकर, सौरभ मोरे, प्रमोद मोरे, रुद्र वाघमारे, वैभव सुपनेकर, सूरज आजमाने या विद्यार्थ्यांना सुवर्णबाण पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांना कबमास्टर युनिट लीडर रोहित गुरव, मुख्याध्यापक संपत कदम, प्रताप मोकाशी, रंजना शिंदे, बबिता कर्नाळे, आदींचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र बनकर यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Gold arrow award to six students of Malwadi school