समाजातील देवमाणूस (हॅलो तीन लेख)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:30+5:302021-07-01T04:19:30+5:30
डॉ. रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ मध्ये पटणा येथे झाला. फिजिशियन डॉ. बिधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे ...

समाजातील देवमाणूस (हॅलो तीन लेख)
डॉ. रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ मध्ये पटणा येथे झाला. फिजिशियन डॉ. बिधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे डॉ. रॉय यांना ‘पश्चिम बंगालचे आर्किटेक्ट’ असेही म्हणतात. डॉ. रॉय यांचे शिक्षण कोलकात्यामध्ये झाले. ‘एमआरसीपी’ आणि ‘एफआरसीएस’ची पदवी त्यांनी लंडनमधून घेतली आहे. १९११ पासून त्यांनी भारतात वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. आज डॉक्टर कोरोनाविरोधात लढा देत आहेत. आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवीत आहेत. आपल्या सांगली जिल्ह्याचाच विचार केला, तर आज खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर व त्यांची यंत्रणा कोरोनाच्या विरोधात लढा देत आहे. आज ‘डॉक्टर डे’निमित्त त्यांच्या कार्याला सलाम.
कोरोनामुळे लोकांच्या मृत्यू पावण्याच्या बातम्या नियमित कानावर पडत आहेत. त्यामुळे सर्वत्र भयावह परिस्थिती आहे; पण आशा परिस्थितीतदेखील स्वत:च्या जिवाची पर्वा न करता, कुटुंबापासून दूर राहून काही देवमाणसे दिवसरात्र कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. या देव माणसांना आपण डॉक्टर म्हणून ओळखतो. कोरोना काळात डॉक्टरांनी केलेली देशसेवा खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. त्यामुळे डॉक्टरांना त्यांच्या अनमोल कार्याबद्दल शुभेच्छा देणे, त्यांचे कौतुक करणे आपले कर्तव्य बनते.