जयंतरावांविरुद्ध महाडिक गटाचे देव पाण्यात

By Admin | Updated: July 25, 2014 23:37 IST2014-07-25T23:07:18+5:302014-07-25T23:37:11+5:30

विधानसभा निवडणूक : राहुल महाडिक यांच्या दाढीचे रहस्य काय?

God of Mahadiq group against Jayantrava in water | जयंतरावांविरुद्ध महाडिक गटाचे देव पाण्यात

जयंतरावांविरुद्ध महाडिक गटाचे देव पाण्यात

अशोक पाटील - इस्लामपूर ,,इस्लामपूर मतदारसंघात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधातील उमेदवारीचा निर्णय लवकर व्हावा म्हणून नानासाहेब महाडिक यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी देव पाण्यात घातले आहेत. परंतु त्यांच्या उमेदवारीला महायुतीकडून खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच हिरवा कंदील मिळणार आहे. त्यातच व्यंकटेश्वरा शिक्षण संकुलाचे नेते राहुल महाडिक यांनी श्रावणाआधीच दाढी वाढवली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्याविरोधात सक्षम उमेदवार मिळेपर्यंत महाडिक दाढी ठेवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मध्यंतरीच्या काळात जयंत पाटील यांनी दाढी वाढवली होती. त्याबाबत राज्यभर चर्चा चालू होती. शेवटी जयंतरावांच्या दाढीचे रहस्य कोणालाच उलगडले नाही. आता तोच कित्ता गिरवत राहुल महाडिक यांनी दाढी वाढवली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाडिक यांची भूमिका गनिमीकाव्याची होती, असे मानले जाते. ते इस्लामपूर मतदारसंघात सक्षम उमेदवार उभा करण्यासाठी जयंतरावांच्या विरोधकांना एकत्र करण्याच्या तयारीला लागले आहेत. परंतु त्यात त्यांना अद्याप यश मिळालेले नाही.
काही दिवसांपासून महाडिक समर्थक खा. शेट्टी यांच्या संपर्कात आहेत. कोणत्याही परिस्थितीत महायुतीकडून नानासाहेब महाडिक यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिराळा मतदारसंघात शिवाजीराव नाईक यांना महाडिक यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्यातील दरी कमी करण्यासाठीही काहींनी ‘सुपारी’ घेतली आहे.
इस्लामपूर मतदारसंघात महायुतीकडून सदाभाऊ खोत, शिवसेनेचे आनंदराव पवार यांचीही नावे चर्चिली जात आहेत, परंतु स्वत: नानासाहेब महाडिक यांनी उमेदवारीबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे ते थांबले, तर आपण आहोतच, असे सूचित करण्यासाठी राहुल महाडिक यांनी दाढी वाढवली की काय, अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.
गनिमीकावा
लोकसभा निवडणुकीत महाडिक यांची भूमिका गनिमीकाव्याची होती, असे मानले जाते. ते इस्लामपूर मतदारसंघात सक्षम उमेदवार उभा करण्यासाठी जयंतरावांच्या विरोधकांना एकत्र करण्याच्या तयारीला लागले आहेत. परंतु त्यात त्यांना अद्याप यश मिळालेले नाही.

Web Title: God of Mahadiq group against Jayantrava in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.