गावठी कुत्र्यांकडून शेळी, कोकरे फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:33 IST2021-02-27T04:33:42+5:302021-02-27T04:33:42+5:30

इस्लामपूर : शहरातील इंदिरा कॉलनी परिसरातील दोन लहान मुलांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला. याचबरोबर आता बहे रोड परिसरातील दत्त ...

Goats, lambs from village dogs | गावठी कुत्र्यांकडून शेळी, कोकरे फस्त

गावठी कुत्र्यांकडून शेळी, कोकरे फस्त

इस्लामपूर : शहरातील इंदिरा कॉलनी परिसरातील दोन लहान मुलांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला. याचबरोबर आता बहे रोड परिसरातील दत्त सॉ मिल आवारात असलेल्या एक शेळी, दोन कोकरांवर पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला करून फस्त केले. या परिसरात मटण व मच्छी मार्केट असल्याने शंभरहून अधिक गावठी कुत्र्यांचा वावर आहे, तर इस्लामपूर शहरात बाहेर गावातील काही कुत्री आणून सोडल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.

याबाबत माहिती अशी की, बहे रोडवरील आनंदा दिलीप पवार यांच्या मालकीची दत्त सॉ मिल आहे. याच परिसरात शेळ्यासाठी गोठा आहे. या गोठ्यात असणारी शेळी आणि दोन कोकरांवर या परिसरातील गावठी कुत्र्यांनी हल्ला करून फस्त केले. याबाबतची तक्रार इस्लामपूर पालिकेतील आरोग्य विभागाकडे केली आहे. असाच त्रास या परिसरातील नागरिकांना होत असून, पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी नागरिकांतून आहे.

Web Title: Goats, lambs from village dogs