मांगले येथें बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:25 IST2020-12-24T04:25:24+5:302020-12-24T04:25:24+5:30

मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील चरापले वस्तीवरील निवास अंकुश चरापले यांच्या जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ...

Goat killed in leopard attack at Mangle | मांगले येथें बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

मांगले येथें बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील चरापले वस्तीवरील निवास अंकुश चरापले यांच्या जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. शेळीला बांधलेली दोरी न तुटल्यामुळे बिबट्याने शेळीला गोठ्याच्या बाहेर ओढून नरडी व पाठीमागील भाग खाल्ला. गोठ्यामध्ये आणखी शेळीची पिल्ली व जनावरे होती. ती सुरक्षित आहेत. दरम्यान, वनसंरक्षक हनुमंत पाटील, कर्मचारी संपत देसाई यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. गेल्या दोन वर्षांत मांगले परिसरातील शिंगटेवाडी, चिखलवाडी, फकीरवाडी, लादेवाडी, इंगरूळ, कांदे, भाटशिरगाव या गावांतील जनावरांच्या गोठ्यांतील ३७ हून अधिक जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना फस्त केले आहे. बिबट्याच्या सततच्या हल्लासत्रामुळे भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Goat killed in leopard attack at Mangle