करमाळेत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:06+5:302021-01-18T04:24:06+5:30
शिराळा : करमाळे (ता. शिराळा) येथील शेतकरी मधुकर यादव यांच्या गाभण शेळीवर रात्री बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेळीच्या ...

करमाळेत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
शिराळा : करमाळे (ता. शिराळा) येथील शेतकरी मधुकर यादव यांच्या गाभण शेळीवर रात्री बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेळीच्या मृत्यू झाला. यामुळे त्यांचे अदांजे १२ ते १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी रात्री ९.४५ वाजता ही घटना घडली.
करमाळे येथील यादव मळ्यात मधुकर यादव यांचे घर आहे.
घराशेजारीच असलेल्या शेडमध्ये शेळी बांधली होती. रात्री अचानक वासरू ओरडल्याने ते घरातून बाहेर आले असता त्यांना बिबट्या दिसला. बिबट्याने बकरीला गळ्याजवळ पकडून ठेवले होते. आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पसार झाला. काही वेळाने शेळी मृत्युमुखी पडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन अधिकारी व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.