निगडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:14+5:302021-04-23T04:29:14+5:30

शिराळा : निगडी (ता. शिराळा) येथील ज्ञानदेव साळुंखे यांच्या जनावरांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे मृत्यू झाला. यामध्ये त्यांचे ...

Goat killed in leopard attack | निगडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

निगडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

शिराळा

: निगडी (ता. शिराळा) येथील ज्ञानदेव साळुंखे यांच्या जनावरांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे मृत्यू झाला. यामध्ये त्यांचे अंदाजे १२ ते १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेळी दोन महिन्यांची गाभण होती. शिराळा वनविभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

साळुंखे यांचे पाडळीवाडी रस्त्याला शेतात घर आहे. घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गोठ्याशेजारी बैलगाडीला शेळी बांधली होती. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या पत्नी सुनंदा साळुंके गाईची धार काढत असताना अचानक शेळीचा आवाज यायचा बंद झाला. म्हणून त्यांनी पाहिले असता, बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याचे दिसले. बिबट्याने शेळीच्या मानेला घट्ट चावा घेऊन ओढत नेल्याचे पाहिले. त्यांनी बिबट्याला पळवून लावण्यासाठी दगड आणि काठीने त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या धाडसामुळे बिबट्याने तिथून पळून ठोकला. मात्र, शेळीचा मृत्यू झाला आहे. शेळीला शेतातच पुरण्यात आले.

या घटनेचा शिराळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

हल्ला करण्याच्या पद्धतीनुसार तो बिबट्याच असल्याचे निश्चित झाले आहे. लवकरच संबंधित शेतकरी कुटुंबाला नुकसानभरपाई मिळणार आहे. यावेळी बिळाशीचे वनपाल चंद्रकांत देशमुख, खुजगाव विभागाच्या वनरक्षक देवकी, तहसीलदार उपस्थित होत्या.

Web Title: Goat killed in leopard attack