शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
4
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
5
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
6
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
7
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
8
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
9
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
12
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
13
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
14
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
15
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
16
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
17
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
18
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
19
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
20
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
Daily Top 2Weekly Top 5

पीयुसी प्रमाणपत्रासाठी आता जीओ टॅगिंग सक्तीचे, बोगसगिरीला आळा बसणार

By संतोष भिसे | Updated: June 21, 2024 19:07 IST

५ जूनपासून अंमल, बोगसगिरीला आळा, फक्त नंबरप्लेटवर नाही मिळणार प्रमाणपत्र

सांगली : पीयुसी प्रमाणपत्रातील बोगसगिरीला आळा घालण्यासाठी शासनाने लोकेशन आधारीत पीयुसी प्रमाणपत्र प्रणाली सुरु केली आहे. ५ जूनपासून ती राज्यभरात अंमलात आली. दरम्यान, या प्रणालीशी जुळवून घेऊ न शकल्याने अनेक पीयुसी केंद्रांचे कामकाज थांबले आहे.पीयुसी प्रमाणपत्राविना वाहनाचा विमा उतरवला जात नाही. प्रमाणपत्राचा खर्च कमी असला, तरी ते काढण्यास वाहनमालक टाळाटाळ करतात. धूर तपासणीसाठी प्रत्यक्ष केंद्रावर वाहन न आणता त्याच्या नंबर प्लेटचे छायाचित्र मोबाईलवरुन पाठवतात. काही पीयुसी केंद्रचालक हे छायाचित्र पोर्टलवर अपलोड करतात. प्रत्यक्ष धूर न तपासता बोगस पीयुसी प्रमाणपत्र देतात. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पोर्टलमध्ये हेराफेरी केली जाते. या बोगसगिरीसंदर्भात राज्यभरातून तक्रारी परिवहन आयुक्तांकडे गेल्या. त्यामुळे शासनाने सॉफ्टवेअरमध्ये बदल केले आहेत. नवे सॉफ्टवेअर ५ जूनपासून कार्यान्वित झाले. नवे व्हर्जन न घेतल्याने राज्यभरातील शेकडो पीयुसी केंद्रे सध्या बंद आहेत.

अशी आहे नवी प्रणाली

  • नव्या प्रणालीमध्ये पीयुसी केंद्राचे जीओ टॅगिंग केले आहे. प्रत्येक केंद्राची जागा निश्चित असून त्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आहे. तेथून ५० मीटर अंतराबाहेर जरी केंद्र गेले, तरी प्रमाणपत्र तयार होत नाही.
  • यापूर्वी फक्त नंबर प्लेटच्या छायाचित्राच्या आधारे प्रमाणपत्र दिले जायचे. नव्या प्रणालीत मागील व पुढील नंबर प्लेटस आणि वाहनाच्या सायलेन्सरची चित्रफित तयार करुन पोर्टलवर अपलोड करायची आहे.

खर्च वाढला, शुल्कही वाढवादरम्यान, चित्रफित तयार करण्यासाठी इंटरनेटची सोय असणारा मोबाईल वापरावा लागणार आहे. एका केंद्रासाठी दोन नोंदणीकृत मोबाईल वापरण्यास परवानगी आहे. यापूर्वी पाच मिनिटांत प्रमाणपत्र तयार व्हायचे. नव्या प्रणालीत हा वेळ १५ मिनिटांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे दिवसभरात प्रमाणपत्रांची संख्या आणि व्यवसाय कमी झाला आहे. खर्चात वाढ आणि उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे पीयुसी प्रमाणपत्राचे शुल्क वाढविण्याची मागणी पीयुसी असोसिएशनने केली आहे.

टॅग्स :Sangliसांगली