एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांना पकडणाऱ्या पोलिसांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST2021-05-29T04:21:12+5:302021-05-29T04:21:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील शंभर फुटी रोडवरील त्रिमूर्ती चौकीजवळ एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना शहर पोलिसांनी अटक ...

एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांना पकडणाऱ्या पोलिसांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील शंभर फुटी रोडवरील त्रिमूर्ती चौकीजवळ एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली होती. या मशीनमध्ये त्यावेळी २५ लाख ८५ हजार ५०० रुपये होते. पोलिसांनी चोरट्यांचा प्रयत्न हाणून पाडत मोठ्या रकमेचेही संरक्षण केल्याबद्दल शुक्रवारी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या हस्ते कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचा गौरव करण्यात आला.
२१ मे रोजी शंभर फुटी राेडवर असलेल्या त्रिमूर्ती चौकीच्या मागे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये दोन जण चोरीचा प्रयत्न करत होते. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना हे दिसून आल्यानंतर त्यांनी दोघांना पकडले. या एटीएमध्ये २५ लाख ८५ हजार ५०० रुपयांची रक्कम होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या रकमेचे संरक्षण झाले.
गुरुवारी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, साहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, एस. बी. ऐवळे, जे. एम. आत्तार, विक्रांत घेरडे, एम. व्ही. शिंदे, यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.