वाटेगावमध्ये कोविड योध्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:58+5:302021-07-14T04:31:58+5:30

वाटेगाव : वाटेगाव (वाळवा) येथे इस्लामपूर शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील, यांच्या वाढदिवसानिमित्त प्रांजली अर्बन बँकेचे ...

The glory of Kovid warriors in Wategaon | वाटेगावमध्ये कोविड योध्यांचा गौरव

वाटेगावमध्ये कोविड योध्यांचा गौरव

वाटेगाव : वाटेगाव (वाळवा) येथे इस्लामपूर शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील, यांच्या वाढदिवसानिमित्त प्रांजली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष युवक नेते राहुल पाटील यांच्यावतीने कोरोना महामारीमध्ये कोविड योद्धा म्हणून काम केलेल्या ७५ कोविड योध्यांचा गौरव सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील, राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

वाटेगाव ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी शिक्षिका/मदतनीस, ग्रामविकास अधिकारी सुरेश सातवेकर, तलाठी जयकर कदम, पोलिस पाटील संतोष करांडे, कासेगाव आरोग्य विभागाचे डॉ. राजेंद्र भिसे, डॉ रासकर, अशोक कोकडे ,पत्रकार या कोविड योद्ध्यांचा सत्कार वाटेगावचे सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील, युवा नेते राहुल पाटील, वाटेगावचे ग्रामविकास अधिकारी एस. डी. सातवेकर, ग्रामपंचायत सदस्य विनोद जाधव, रमेश साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक विनोद जाधव यांनी केले.

फोटो : वाटेगाव येथे कोविड योद्ध्यांचा गौरव करताना राहुल पाटील, सुरेश साठे, शुभांगी पाटील.

Web Title: The glory of Kovid warriors in Wategaon