शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Raju Shetty: राजकारणापेक्षा चळवळीला महत्त्व देणार, लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टी म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 11:49 IST

पन्नास खोके याबद्दल शेट्टी यांना छेडले असता यावर त्यांनी मौन पाळले

अशोक पाटीलइस्लामपूर : विविध पक्षांशी घरोबा केल्यानेच शेतकरी चळवळ मागे पडली. आगामी काळात कोणत्याही पक्षाशी घरोबा करणार नाही. पुन्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताकदीवरच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढविणार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.शेट्टी म्हणाले, सत्तेसाठी आपण राजकारण करणार नाही. चळवळीच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बळ देण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये स्वाभिमानी संघटनेचे सरपंच आणि सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना बळ आले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका संघटनेची असणार आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विशेषत: सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणात मतांच्या घोडेबाजाराचा ट्रेंड आला आहे. यावर शेट्टी म्हणाले, आपण अशा ट्रेंडच्या पाठीमागे लागणार नाही. जन्मत: आमचे रक्त चळवळीचे आहे. चळवळीतून आपण मोठे झालो आहोत. आगामी काळात राजकारणापेक्षा चळवळीला महत्त्व देणार आहे. यासाठी राज्यातील कार्यकर्त्यांना बळ देणार आहोत. प्रत्येक भागातील स्वाभिमानीचा कार्यकर्ता सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका बजावून स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करत आहे. त्यामुळे आता राजकारणापेक्षा चळवळच आम्हांला महत्त्वाची वाटत आहे.ते म्हणाले, आगामी काळात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पक्षीय उमेदवारांची संख्या कितीही असो, आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच निवडणूक लढविणार आहोत. कोणत्याही पक्षाशी घरोबा करणार नाही.एक व्होट एक नोटपन्नास खोके याबद्दल शेट्टी यांना छेडले असता यावर त्यांनी मौन पाळले. परंतु आगामी लोकसभेला मात्र एक व्होट एक नोट हा स्वाभिमानीचा नारा घेऊनच निवडणुकीत उतरणार. मतदार, शेतकरी राजा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील, असाही विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टी