शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

निरक्षरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी सेवानिवृत्त शिक्षकांकडे द्या, जुनी पेन्शन संघटनेची शिक्षण संचालकांकडे मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: October 27, 2023 13:57 IST

सांगली : नवसाक्षरता कामावर शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. शिक्षक अतिरिक्त कार्यभार सांभाळत ...

सांगली : नवसाक्षरता कामावर शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. शिक्षक अतिरिक्त कार्यभार सांभाळत असताना पुन्हा प्रौढ शिक्षण सर्वेक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर टाकू नये. त्याऐवजी सेवानिवृत्त शिक्षकांकडे सर्वेक्षणाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेतर्फे शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याकडे केली.जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षण संचालक महेश पालकर यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले. यावेळी माजी आमदार भगवान साळुंखे, उर्दू शिक्षक भारती संघटनेचे राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल, समन्वय समिती अध्यक्ष अविनाश गुरव, शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे, शिक्षक संघाचे अध्यक्ष अमोल माने, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे, सुनील गुरव, राजेंद्र नागरगोजे, सुधाकर माने, विरेश हिरेमठ, राजकुमार भोसले, नेताजी भोसले, स्वप्नील मंडले आदी उपस्थित होते.शिक्षण संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, निरक्षर १०० टक्के साक्षर झाले पाहिजे. पण, या मोहिमेत सेवानिवृत्त शिक्षकांना सहभागी करून घेण्याची गरज आहे. शासनाने आता सेवानिवृत्त शिक्षकांना काही ठिकाणी नियुक्त केले आहे. या शिक्षकांनाच निरक्षरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देऊन नियमित शिक्षकांना सर्वेक्षणातून वगळण्याची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती भरताना वजन, उंची या बदल होणाऱ्या बाबी नोंदवण्याची सक्ती नसावी. तसेच रक्त गट तपासणी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र मोहीम राबवून १०० टक्के विद्यार्थ्यांचे रक्त गट तपासून ते उपलब्ध करून देईपर्यंत सदर माहिती भरण्याची सक्ती करू नये, आदी मागण्या शिक्षण संचालकांकडे केल्या आहेत.

शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश द्या : अमोल शिंदेआंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या डीसीपीएस योजनेत कपात रक्कम एनपीएसमध्ये वर्ग करण्याबाबत निश्चित मुदतीत कार्यवाही झाली पाहिजे. तसेच सदर रक्कम ज्या दिनांकाला वर्ग होईल तो पर्यंतचे व्याज मिळाले पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश अनुदान जून महिन्यात वर्ग करून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन गणवेश उपलब्ध झाला पाहिजे, अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक