गलाई व्यवसायास लघु उद्योगाचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:55+5:302021-02-06T04:48:55+5:30
खानापूर : पारंपरिक गलाई व्यवसायाला केंद्र शासनाकडून कायमस्वरूपी व्यवसाय परवाना व लघु उद्योगधंद्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी नॅशनल गोल्ड ...

गलाई व्यवसायास लघु उद्योगाचा दर्जा द्या
खानापूर : पारंपरिक गलाई व्यवसायाला केंद्र शासनाकडून कायमस्वरूपी व्यवसाय परवाना व लघु उद्योगधंद्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी नॅशनल गोल्ड ॲण्ड सिल्व्हर रिफायनरी व ज्वेलर्स असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
संपूर्ण देशात गलाई व्यवसायानिमित्त विखुरलेल्या गलाई बांधवांना केंद्र शासनाकडून परवाना मिळावा, गलाई व्यवसायास उद्योगधंदा, लघु उद्योग म्हणून अधिकृत मान्यता मिळावी, यासाठी दिल्ली येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी मागणी लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन दिले.
ऑल इंडिया हॉलमार्किंग संघटनेचे अध्यक्ष उदय गजानन शिंदे, उत्तर प्रदेश मराठा महासंघाचे अध्यक्ष उमेश पाटील, संतोष पाटील, वसंतराव पाटील, गोरखनाथ पाटील, संजय शिंदे, अमित पाटील, कुमार साळुंखे उपस्थित होते.
फोटो-०५खानापूर१