बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:52+5:302021-09-26T04:27:52+5:30
निवेदनात म्हटले आहे की, मुंबईतील सोनपाडा परिसरात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे महिला वर्गामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा ...

बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्या
निवेदनात म्हटले आहे की, मुंबईतील सोनपाडा परिसरात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे महिला वर्गामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे स्त्रियांचे समाजात वावरणे कठीण झाले आहे.
सोनपाडा येथील घटनेचा निषेध करीत इंद्रायणी संस्थेने गरवारे महाविद्यालय, राणी सरस्वती प्रशाला, महिला वसतिगृह येथील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा करुन निवेदनासाठी पाठिंबा घेतला. सुमारे तीनशे महिला व विद्यार्थिनींनी निवेदनावर सह्या करुन अशा घटनांना वेळीच आळा घालावा व आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली. संस्थेचे स्वप्नजीत पाटील, प्रा. आर. व्ही. लोंढे, सचिन मासाळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. चाैधरी यांना निवेदन सादर केले.
फोटो : २५ ग्राम १
ओळ : सांगलीत इंद्रायणी संस्थेतर्फे स्वप्नजीत पाटील, प्रा. आर. व्ही. लोंढे, सचिन मासाळ यांनी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना निवेदन दिले.