होलार समाजाला चर्मकार महामंडळाचे अध्यक्षपद द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:01+5:302021-08-25T04:31:01+5:30
जत : होलार समाजाला सत्तेमध्ये समाविष्ट करून घेऊन चर्मकार आर्थिक विकास महामंडळामध्ये स्थान देऊन समाजाला अध्यक्ष व दोन संचालकपदे ...

होलार समाजाला चर्मकार महामंडळाचे अध्यक्षपद द्या
जत : होलार समाजाला सत्तेमध्ये समाविष्ट करून घेऊन चर्मकार आर्थिक विकास महामंडळामध्ये स्थान देऊन समाजाला अध्यक्ष व दोन संचालकपदे राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात यावीत, अशी मागणी अखिल भारतीय होलार समाज संघटना (ए) गटाचे आबासाहेब ऐवळे यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये होलार समाजाची लोकसंख्या पंचवीस लाख असून, या समाजाला स्वातंत्र्यापासून आजअखेर कोणत्याही पक्षाने राजकीय स्थान दिले नाही. तरी हा समाज नेहमी सांगली जिल्हयामध्ये व महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षासोबत कायम राहिला असून, जयंत पाटील हेच व त्यांचा राष्ट्रवादी पक्षच होलार समाजाला न्याय देऊ शकतो. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने लक्ष घालून होलार समाजाला चर्मकार आर्थिक विकास महामंडळामध्ये स्थान देऊन समाजाला अध्यक्ष व दोन संचालकपदे आपल्या पक्षाकडून देण्यात यावीत. होलार समाजाला स्वातंत्र्यापासून न्याय कोणीही देऊ शकलेले नाही. तो न्याय आपण समाजाला दयावा, असे निवेदनात म्हटले आहे
या मागण्यांचे निवेदन देताना आबासाहेब ऐवळे, अविनाश वाघमारे, कुंभारीचे सरपंच राजाराम जावीर, एन. डी. कांबळे, ज्येष्ठ नेते बाजी केंगार, राष्ट्रवादी नेते सुरेश शिंदे, राष्ट्रवादी युवक जत तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण, नगरसेवक स्वप्नील शिंदे उपस्थित होते.